ज्येष्ठ नेते शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय झाल्यावर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट करत टीका केली होती. त्यांच्या पोस्टची बरीच चर्चाही झाली.
शरद पवारांना झेड प्लस सिक्युरिटी मिळाली आहे, ५५ CRPF त्यांना संरक्षण देणार. मला कळत नाही त्यांना कोण मारणार आणि कोणापासून त्यांना धोका आहे??
बातमी वाचली आणि वाटलं की 50 वर्ष फक्त देशात आणि राज्यात कळ काढत बसलं तरी कुणालाही झेड प्लस संरक्षण मिळतं की काय?? असा टोला निलेश राणे यांनी लगावला होता.