Sunday, December 8, 2024

सुप्रिया सुळेंचे भाषण म्हणजे शाळेत लिहिलेला वडीलांवरील निबंध…

राष्ट्रवादी पक्षात सध्या दोन गट पडलेत. एक शरद पवार यांचा तर दुसरा अजित पवार यांचा. काल या दोन्ही गटांनी बैठकींचं आयोजन केलं होतं. शरद पवार यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरला बैठक बोलावली होती तर अजित पवार यांनी वांद्रेतील एमईटी या ठिकाणी आमदारांची बैठक बोलावली होती. यशवंतराव चव्हाण सेंटरला झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या कार्यध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी भाषण केलं. या भाषणात संघर्षाच्या काळात आपण वडिलांसोबत असल्याच्या मुद्द्यावर जोर दिला. त्यावर आता भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे.

निलेश राणे यांचं ट्विट …

खासदार सुप्रिया सुळे यांचे भाषण ऐकून असं वाटतं की लहानपणी जेव्हा आपल्याला टीचर वडिलांवरती एक पान लिहायला सांगायची, उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळेंकडे स्वतःच्या वडिलांबद्दल सांगण्या पलीकडे काही नाही.

जास्त हसून बोलणारी लोकं ही नेहमी खोटारडी असतात हे आजपर्यंतचा जाणवलं म्हणून खासदार सुळे जेवढ्या बोलतील तितकं त्यांच्या विरोधकांना चांगलंच आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles