महिला सरपंच म्हणजे पतीराज कामकाज करणार आणि ग्रामपंचायतीत महिला फक्त नामधारी असंच साधारण बोललं जातं. परंतु, पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या महिला सरंपच निर्मला शुभम नवले या उच्च शिक्षित असून वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी त्या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. त्या स्वत: आयटी इंजिनिअर असून ग्रामविकासाचा ध्यास घेवून त्या राजकारणात उतरल्या व बिनविरोध सरंपचही झाल्या. त्या सोशल मिडियावरही खूप सक्रिय असतात. त्यांच्या अकाउंटला लाखो फॉलोअर्स आहेत.