Monday, April 22, 2024

देशाच्या अर्थमंत्री म्हणतात…माझ्याकडे लोकसभा निवडणूक लढवायला पैसे नाहीत…

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय जनता पक्षाचा (भाजप) लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रस्तावाला नकार दिला आहे. यामागचे कारण देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आपल्याकडे आवश्यक पैसे नसल्याचे त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले आहे. याची माहिती स्वतः निर्मला सीतारामन यांनी एका कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना दिली आहे. विशेष म्हणजे भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांना आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडूमधून निवडणूक लढवण्याचा पर्याय दिला होता.

एका कार्यक्रमादरम्यान बोलतांना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, “पक्षाने मला लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत विचारणा केली होती. मला आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्यांचा पर्याय देखील देण्यात आला होता. यासाठी मी एक आठवडा किंवा 10 दिवस विचार केला. त्यानंतर मी निवडणूक लढवण्यासाठी नकार दिला. आंध्र प्रदेश असो किंवा तामिळनाडू, माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी एवढा पैसा नाही, असे सीतारामन म्हणाल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles