Wednesday, April 17, 2024

कराळे गुरुजींना लागले निवडणुकीचे वेध! लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यासाठी सज्ज

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तारखा जाहीर झाल्यापासून तिकिटासाठी सगळीकडे फिल्डिंग लावली जात असलेली पाहायला मिळाली आहे. अशातच सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले फेम कराळे गुरूजी यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीसाठी आपली उमदेवारी कशी सक्षम आहे हे कराळे गुरूजींनी सांगितलं. कराळे यांनी मविआमधून कोणत्याही पक्षाकडून उभं राहण्याची तयारी दर्शवली आहे.

प्रसिद्धीस आलेल्या कराळे गुरूजींनी अकादमीसोबत विद्यार्थी, शेतकरी आंदोलनामध्ये सहभाग घेतला. 2020 मध्ये कराळे गुरूजी नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उभे राहिले होते. या निवडणुकीध्ये कराळे गुरूजींना 8500 मते मिळाली होतीत. गुरूजींना मिळालेली मते नेकांना थक्क करणारी होतीत. त्यानंतर सामाजिक प्रश्नांना घेऊन आपली भूमिका सुरूच ठेवली आहे. आता यंदा त्यांना लोकसभेचं तिकिट मिळतं का? जर तिकिट नाही मिळालं तर कराळे अपक्ष उभे राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles