भाजप आमदार नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका अद्यापही सुरुच आहे. नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं. “पोलिसांना एक दिवसाची सुट्टी देतो. त्यांनी त्यांची ताकद दाखवावी, आम्ही आमची ताकद दाखवतो”, असं नितेश राणे म्हणाले आहेत. नितेश राणे यांची आज सांगलीत हिंदू जन आक्रोश मोर्चाची सभा पार पडली. यावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. “या लोकांना काय वाटतं की, ह्यांच्या धमक्यांना भीक देणारे आम्ही लोकं आहोत. आम्ही सांगतो, चला या पोलिसांना सांगतो की, एक दिवसाची सुट्टी देतो. तुम्ही तुमची ताकद दाखवा. हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवायला मैदानात उतरतो. आम्हालाही बघायचं आहे की, त्या दिवसाच्या नंतर दुसरी सकाळ हिंदू बघतात की मुसलमान बघतात. तुम्हाला त्या जिहाद्यांना आवरायला जमत नसेल तर एक दिवस शुक्रवारी सुट्टी घ्या. त्या लोकांना साफ करण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल. पुढच्यावेळी एकही लव्ह जिहादची केस तुमच्यासमोर आली तर आधी त्याला शोधा, त्याच्या तंगड्या तोडा. मला फोन करा. काहीही होणार नाही ही माझी जबाबदारी”, असं नितेश राणे म्हणाले.