Saturday, May 25, 2024

नितेश राणेंचा मतांसाठी सरपंचांना सज्जड दम, मेळाव्यात सरपंचांना म्हणाले…

देशात पुढच्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. लोकसभेचे उमेदवार पूर्ण ताकदीनिशी प्रचार करू लागले आहेत. मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी वेगवेगळी आश्वासनं दिली जात आहेत. तर काही नेते मतदारांना वेगवेगळ्या प्रकारची अमिषं दाखवत आहेत. अशातच कणकवलीचे आमदार नितेश राणे हे त्यांच्या वडिलांचा (नारायण राणे) प्रचार करू लागले आहेत. भारतीय जनता पार्टीने नारायण राणे यांना अद्याप उमेदवारी दिलेली नाही. त्याआधीच त्यांनी आणि इतर भाजपा कार्यकर्त्यांनी नारायण राणेंच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग येथे भाजपाच्या संवाद मेळाव्यात सिंधुदुर्गमधील वेगवेगळ्या गावच्या सरपंचांना संबोधित केलं यावेळी राणे यांनी सरपंचांना मतांसाठी सज्जड दम दिला.
नितेश राणे संवाद मेळाव्यात सरपंचांना म्हणाले होते, ही निवडणूक आपली आहे अशा पद्धतीने प्रत्येकाने यंत्रणा राबवायची आहे. तुम्हाला तुमच्या निवडणुकीत जेवढं मतदान मिळालं होतं, तेवढं किंवा त्यापेक्षा जास्तच मतदान मला हवं आहे. त्यापेक्षा एक टक्कादेखील कमी मतदान मिळालं तर मला ते चालणार नाही. मी ४ जून रोजी सर्वांचा हिशेब घेऊनच बसणार आहे. कारण त्यानंतर तुम्हाला आमदारांकडे निधी मागायला यायचं आहे. ४ जूनला आम्हाला हवं तसं लीड मिळालं नाही आणि त्यानंतर तुम्हाला हवा असलेला निधी वेळेत मिळाला नाही तर तुम्ही तक्रार करायची नाही.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles