Tuesday, April 23, 2024

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून रामदास आठवलेंना उमेदवारी द्या अन्यथा….

अहमदनगर (प्रतिनिधी)- शिर्डी लोकसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना उमेदवारी मिळावी म्हणून गेल्या वर्षभरापासून आरपीआयच्या वतीने मागणी केलेली आहे. निवडणुकीच्या काळातच आरपीआय पक्षाची आठवण येते अन्यथा कोणत्याही कार्यक्रमांमध्ये आठवले यांचा विसर पडत असून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देखील विश्वासात घेतले जात नाही त्यामुळे भाजपने आठवले यांनाच उमेदवारी द्यावी अन्यथा आम्ही आरपीआयचे कार्यकर्ते भाजपाचा प्रचार करणार नाही उलट रिपब्लिकन पक्षाचा अपक्ष उमेदवार देऊ व लवकरच अहमदनगर दक्षिण मतदार संघात मेळावा घेऊन भूमिका स्पष्ट करणार असल्याचा इशारा उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे यांनी दिला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची बैठक झाल्यानंतर त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे समवेत दक्षिण जिल्हाध्यक्ष सजंय भैलुमे, उत्तर महा. शशीकातदादा पाटील, युवक अध्यक्ष अमित काळे, विलास साठेसर, सदाशिव भिंगारदिवे, विनोद भिंगारदिवे, चंद्रकांत भिंगारदिवे, चंद्रकांत ठोबें, नाना पाटोळे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजु जगताप, पारनेर तालुकाध्यक्ष राजेंद्र इबाळे, पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू, जेष्ठ नेते गौतम घोडके, दया गजभिजे आदिसह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत आरपीआय पक्षाला सोलापूर व शिर्डी या दोन जागा मिळावी म्हणून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी केली होती. त्यापैकी शिर्डीची जागा आरपीआयचे नेते रामदास आठवले यांच्यासाठी मागितली होती आठवले यांना मागील सारखे राज्यसभा व मंत्रीपद देऊन शांत करणार असाल तर ते आम्ही खपून घेणार नाही आम्ही भाजपा बरोबर 2009 साला पासून काम करत आहोत. 2014 मध्ये त्यांचा आम्ही प्रचार केला आमचे केंद्रात राज्यात भलेही आमदार खासदार नसतील मात्र आमच्या पक्षाच्या जोरावरच त्यांना सत्ता स्थापन करता आली. त्यामुळे भाजपने त्यांना राज्यसभेवर घेऊन मंत्रीपद दिले यावेळी भाजपने आम्ही मागणी केलेली आहेकी सोलापूर व शिर्डी मतदारसंघातून रामदास आठवले यांना सन्मानपूर्वक उमेदवारी जाहीर करावी अन्यथा जर सन्मानपूर्वक शिर्डीची जागा मिळाली नाही तर भाजपा विरुद्ध प्रचार करून सोलापूर व शिर्डी मतदार संघातून अपक्ष उमेदवार देऊ असा इशारा बैठकीतून देण्यात आला व लवकरच अहमदनगर दक्षिण मतदार संघात समाज बांधवांचा मेळावा घेऊन भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles