Tuesday, June 25, 2024

अहमदनगर जिल्ह्यातील निवृत्ती वेतन धारकांना सुचना….

अहमदनगर दि. 24 मे :- जिल्हा कोषागारामार्फत निवृत्तीवेतन धारकांना निवृत्तीवेतन, सुधारित निवृत्तीवेतन, कुटूंबनिवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतन विषयक इतर लाभ प्रदान करण्यात येतात. हे लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे वसुलीबाबत किंवा प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेबाबत कोषागार कार्यालयामार्फत फोन करून संपर्क साधला जात नाही. तसेच ऑनलाईन व्यवहार करण्याविषयी सूचित केले जात नाही. कोणीही अशा दूरध्वनी संदेशास प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती भाग्यश्री जाधव भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्‌वारे केले आहे.

काही निवृत्तीवेतनधारकांना फोन करून ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर कोषागारातील थकीत रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जाते आहे. याबाबतच्या तक्रारी कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत, अशा कोणत्याही प्रकारचा फोन जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत केला जात नाही किंवा कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतनधारकांच्या घरी पाठविले जात नाही.

निवृत्तीवेतन धारकांना दूरध्वनी, भ्रमणध्वनीवरून प्रदाना संदर्भात संपर्क साधून रक्कम ऑनलाईन, गुगल पे, फोन पे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे भरण्याबाबत जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत कळविले जात नाही. कोणीही अशा दूरध्वनी संदेशास प्रतिसाद देऊ नये. याबाबत निवृत्तीवेतनधारकांनी परस्पर रक्कम भरल्यास ती निवृत्तीवेतनधारकाची वैयक्तिक जबाबदारी राहील. तसेच अशा प्रकारचे दूरध्वनी प्राप्त झाल्यास कोषागार कार्यालयास अवगत करावे. तसेच कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास प्रथमतः कोषागार कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा, असेही जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती भाग्यश्री जाधव भोसले व अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) दीपक भाऊसाहेब काटे यांनी कळविले आहे.

Related Articles

1 COMMENT

Comments are closed.

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles