Sunday, March 16, 2025

आता मुलींना उच्च शिक्षणासाठी १०० टक्के रक्कम सरकार भरणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

नगर शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझी लाडकी बहिण योजनेबाबत महिलांशी साधला संवाद

आता मुलींना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी १०० टक्के रक्कम सरकार भरणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

नगर : लाडकी बहिण योजनेसंदर्भात महिलांशी संवाद साधण्यास सुरुवात नगर जिल्ह्यातून केली असून हे माझे आजोळ असून माझा जन्म देखील याच जिल्ह्यात झाला आहे, महिला आर्थिक दृष्ट्या म्हणाव्या तेवढ्या सक्षम नाही, त्यांना सक्षम करायचे आहे, छ. शिवाजी महाराज, आणि शाहू, फुले, आंबेडकर विचारांचे प्रगतशील राज्य आहे, माझी लाडकी बहिण योजनेसाठी ४५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, त्यांना महिन्याला १५०० देण्यात येणार आहे या माध्यमातून महिला आपल्या कुटुंबाला व मुलाबाळांना आर्थिक हातभार लावतील, महिला आपल्या कुटुंबासाठी झटत असतात, गरिबांची मला जाणीव आहे, या योजनेत कोणतीही जातपात धरली नसून सरसकट २१ ते ६५ वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळेल, तसेच आता वर्षातून ३ गॅस सिलेंडरचे पैसे सरकार महिलांच्या खात्यावर जमा करणार आहे, पण विरोधी पक्ष चांगल्या योजनेला विरोध करत आहे, आता मुलींना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी १०० टक्के रक्कम सरकार भरणार आहे चांगल्या कामाला पाठींबा दिला पाहिजे. आ. संग्राम जगताप नेहमीच शहर विकासाचे कामे घेवून येत असतात व ते मार्गी लावून देखील घेतात, प्रशासनाने जर लाडकी बहिण योजनेबाबत अर्ज भरताना पैसे मागितल्यास थेट त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल. लाडकी बहिण योजनेबरोबरच लाडक्या भावासाठी राज्य सरकार निर्णय घेत आहे, शेतक-यांना आम्ही वीजबिल माफ केले आहे, आता इथून पुढे शेतकर्यांना साडे आठ लाख सोलर पंप देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी चांगले नियोजन करून शासनाच्या योजनाची माहिती महिलांना व्हावी यासाठी महिला संवाद मेळाव्याचे उत्तम असे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
नगर शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझी लाडकी बहिण योजनेबाबत महिलांशी संवाद साधला यावेळी महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर माजी आ. अरुण काका जगताप, आ. संग्राम जगताप, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर. मा.उपमहापौर गणेश भोसले, कुमारसिंह वाकळे, अविनाश घुले, महिला शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे, यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, मुलींना १० वी १२ वी पर्यंत मोफत शिक्षण मिळत आहे, , यासाठी ८ लाख वार्षिक उत्पन्न असणार्या कुटुंबातील मुलींना याचा लाभ होईल, या माध्यमातून मुली उच्च पदावर कार्य करतील, रस्ते, पाणी, आरोग्य या विकास कामांबरोबरच महिलांनी महिलांसाठीच्या योजनेचा लाभ घ्यावा, , आता पिंक रिक्षा योजनेसाठी राज्यात १७ शहरांची निवड केली असून यात अहमदनगर शहर असून येथील येथील ३०० महिलांना रिक्षा दिली जाणार आहे, मुलींसाठी लखपती योजना सुरु असून मुलगी जन्मापासून तिच्या नावे पैसे टाकण्याचे काम सरकारकडून सुरु आहे ती मुलगी १८ वर्षाची झाल्यानंतर १ लाख १ हजार रुपये मिळणार आहे, या सर्व योजना बजेट मध्ये तरतूद केल्या आहे, सरकार जनतेचे आहे, त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन करत यावेळी सरकारच्या योजनांची दप्तरीच त्यांनी महिलांना सांगितली.

यावेळी विविध संघटनांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विविध मागण्याबाबत निवेदन देत सत्कार केला

संपत बारस्कर यांचे वृक्षारोपण व संवर्धनाचे सुरु असल्याचे कार्य कौतुकास्पद आहे, पर्यावरणाचे संकट आपल्यावर ओढवले असून वृक्षारोपणाची लोकचळवळ उभी करावी आज माझ्या हस्ते लिंबाचे झाड लावले असून त्याचे जतन करावे, व पर्यावरण समतोल राखण्यासाठी काम करावे, आ. संग्राम जगताप यांचे शहर विकासासाठी सुरु असलेले कार्य कौतुकास्पद आहे असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles