नगर मधील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे ओबीसी भटक्या विमुक्त एल्गार मेळावा पूर्वनियोजन आढावा बैठक अभय आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नगर शहर व तालुका परिसरातील कार्यकर्त्यांनी बाहेर गावावरून मेळावासाठी येणाऱ्या लोकांची नाश्ता, चहा, पाणी आदींची व्यवस्था करण्याचे ठरविले आहे.
सभास्थळी स्वयंसेवक म्हणून अनेकांनी जबाबदारी घेतली आहे. प्रत्येकाने आपले स्वतःचे घरचे कार्य समजून मेळावा यशस्वीतेसाठी सहकार्य करावे असे आवाहन डॉ. नागेश गवळी यांनी केली. यावेळी अंबादास गारुडकर, भगवानराव फुलसौंदर, संजय गारुडकर, बाळासाहेब बोराटे, धनंजय जाधव, दत्ता गाडळकर, नंदू एकाडे, सुभाष लोंढे, बाळासाहेब भुजबळ, माउली गायकवाड, भुजबळ बाळासाहेब आदी उपस्थित होते.
ओबीसींच्या एल्गार मेळाव्यास दिग्गज ओबीसी नेत्यांची हजेरी राहणार आहे. नगर शहरात शनिवारी दि. ३ रोजी क्लेराब्रूस हायस्कूलच्या मैदानावर शनिवारी दूपारी ३ वाजता हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसीचे नेते छगन भुजबळ हे मार्गदर्शन आहेत. तर प्रमुख उपस्थितीत आ. गोपीचंद पडळकर, महादेव जानकर, आ.प्रकाश शेंडगे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आ.राम शिंदे, कल्याणराव दळे, माजी आमदार नारायण मुंडे आदी नेते असतील.