Sunday, July 21, 2024

‘सगेसोयरे’चा जीआर काढल्यास ‘चुन चुन के गिरायेंगे’…. ओबीसी नेत्याचा सरकारला इशारा

राज्यात ओबीसी समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचे आमदार विधानसभा निवडणुकीत ‘चुन चुन के गिरायेंगे’ असा निर्वाणीचा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सगेसोयरेचा जीआर काढलात तरी आगामी निवडणुकीत त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले. ते शनिवारी बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली.

राज्य सरकार हे ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष करत आहे. या मुद्द्यावरुन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी सरकारची आहे. राज्य सरकारकडून आम्हाला ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आम्ही कोणत्याही बैठकीला जाणार नाही.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles