आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत तेलगू देसम पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. आंध्र प्रदेश विधानसभेत टीडीपी युती 175 पैकी 130 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू 9 जून रोजी अमरावती येथे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.ओडिशातील 147 विधानसभा जागांसाठी तसेच लोकसभेच्या 21 जागांसाठी निकाल जाहीर केले जात आहेत. ज्यांच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजप आघाडीवर आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार भाजप आणि नवीन पटनायक यांचा पक्ष बिजू जनता दल यांच्यात निकराची लढत आहे. शनिवारी जाहीर झालेले एक्झिट पोलही असेच अंदाज देत होते.
आतापर्यंतच्या सुरुवातीच्या ट्रेंडनुसार भाजप 50 जागांवर आघाडीवर आहे. तर बिजू जनता दल (बीजेडी) 35 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 7 जागांवर मर्यादित असल्याचे दिसते. ओडिशात बीजेडी आणि भाजपमध्ये निकराची लढत आहे. एक्झिट पोलमध्येही असाच अंदाज वर्तवण्यात आला होता. पोलमध्ये नवीन पटनायक यांच्या बीजेडी आणि भाजपला प्रत्येकी 62-80 जागा मिळण्याची अपेक्षा होती.