शिवसेना शिंदे गटाच्या उत्तर महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांचे राजीनामे.
मुस्लिम समाजाचे प्रेषित मोहम्मद पैगंबर बद्दल अपशब्द बोलणाऱ्या रामगिरी महाराजांना समर्थन देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील सर्व मुस्लिम समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा.
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेना शिंदे गटामध्ये असलेले
अल्पसंख्यांक उत्तर महाराष्ट्र राज्य समन्वयक अंजर अन्वर खान यांचा राजीनामा यांच्यासह
मुस्लिम अल्पसंख्यांक विभागाचे अहमदनगर शिवसेना अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष सरफराज खान, जिल्हाप्रमुख मुस्तफा शेख, जिल्हा उपप्रमुख सरफराज पठाण, उपशहर प्रमुख राजू जहागीरदार, उपशहर प्रमुख शाहरुख कुरेशी यांच्यासह आदी मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी नुकतीच बैठक घेऊन बैठकीमध्ये ठराव करत पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल बेताळ वक्तव्य करणारे रामगिरी महाराज यांना समर्थन केल्याने पक्षातील मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याने सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा ठाम निर्णय घेउन पक्षाचे महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे राजीनामा दिला.
मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर हे जगाला शांतीचे संदेश देणारे आहे. यांच्यावर रामगिरी महाराज यांनी अतिशय बेताल वक्तव्य वापरल्याने सर्व अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाच्या पदाधिकाऱ्यांचे भावना दुखावल्या गेल्याने पक्षातील एकनिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
नगरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा …कारण आले समोर
- Advertisement -