Thursday, July 25, 2024

Ola आणणार दमदार ईलेक्ट्रिक बाईक…बुकींगची संधी..

Ola बेंगळुरू स्थित EV कंपनी Ola 2026 मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक लाँच करू शकते. सर्वकाही व्यवस्थित राहिल्यास, 2026 पासून ओला इलेक्ट्रिक बाईक्सची डिलिव्हरी सुरू होईल. कंपनीने याआधीच एका इव्हेंटमध्ये चार वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रिक बाईक्सच्या कॉन्सेप्ट मांडल्या आहेत. तुम्हाला ओलाची पहिली इलेक्ट्रिक बाईक घ्यायची असेल तर रिजर्वेशन खुले आहे. डायमंडहेड, रोडस्टर, ॲडव्हेंचर आणि क्रूझर अशी ओलाच्या चार आगामी इलेक्ट्रिक बाईक्सची नावे आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओलाने सेबीला दिलेल्या दस्तऐवजात हे उघड झाले आहे की ओला इलेक्ट्रिक बाईक्सची डिलिव्हरी 2026 मध्ये सुरू होईल. तुम्हाला ओलाची इलेक्ट्रिक बाईक घ्यायची असेल तर तुम्ही ऑनलाइन बुक करू शकता. ओला इलेक्ट्रिकच्या अधिकृत वेबसाइटवर रिजर्वेशन खुले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles