शासकीय सेवेत 2005 पूर्वी रूजू झालेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्याना ओल्ड पेन्शन स्कीम लागू करण्याचा निर्णय हा आज झालेल्या मंत्री मंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र जे कर्मचारी २००३, २००४ आणि २००५ नंतर रूजू झाले आणि २००६ मध्ये कायम झाले त्यांना नवीन पेन्शन योजना लागू झाली आहे. त्या सर्वांना जुन्या पेन्शन योजनेत आणण्याची मागणी ओल्ड पेन्शन स्कीम साठी लढा देणारे विश्वास उत्गी यांनी केली आहे. सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली असं म्हटलं आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना जोपर्यंत ही योजना लागू होत नाही तोपर्यंत जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न सुटला असं म्हणता येणार नाही, असं मत उत्गी यांनी म्हटलं आहे.
मंत्री मंडळाने आज 2005 पुर्वीच्या कर्मचाऱ्यांसाठी निर्णय घेतला असला तरी. आज घेतलेल्या निर्णयाने शासकीय कर्मचाऱ्यांचा ओल्ड पेन्शन स्कीम चा प्रश्न सुटलाच नाही असा दावा ओल्ड पेन्शन स्कीम साठी लढा देणारे विश्वास उत्गी यांनी केला आहे. 2005 नंतर एमपीएससी द्वारे शासकीय सेवे रुजू झालेले जवळपास नऊ लाख अधिकारी आणि कर्मचारी आहेत. तसेच शिक्षक वर्ग आणि इतर कर्मचारी मिळून हा आकडा जवळपास 17 लाख कर्मचाऱ्यांपर्यंत जातो. या सर्व कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा ओल्ड पेन्शन स्कीमचा प्रश्न अजूनही कायम असल्याचा दावा विश्वास उतगी यांनी केला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न सुटला!जोपर्यंत ही योजना लागू होत नाही तोपर्यंत
- Advertisement -