रामलीला मैदानावर मोठ्या संख्येने केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग
अहमदनगर – जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ,रेल्वे युनियन ,केंद्रीय कर्मचारी संघटनेसह इतर राज्य कर्मचारी संघटनांनी १० ऑगस्ट २०२३ रोजी रामलीला मैदानावर एकत्र येत भव्य पेंशन मागणी आंदोलन केले. सरकारने पेन्शन लागू करण्याची मागणी मान्य न केल्यास भारत बंदसह बेमुदत संप पुकारण्याचा ईशारा केंद्र सरकारला आंदोलकांनी दिला असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे व जिल्हा सरचिटणीस सुनिल शिंदे यांनी दिली.
राष्ट्रीय पेन्शन आंदोलनाचे निमंत्रक शिव गोपाल मिश्रा ,सहसंयोजक डॉ एम राघवैय्या , अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय महासचिव कमलाकांत त्रिपाठी ,वरिष्ठ उपाध्यक्ष रामचंद्र दबास ,देविदास बस्वदे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.आंदोलकांच्या उपस्थितीने रामलीला मैदान पूर्णपणे खचाखच भरले होते.
जुनी पेन्शन पूर्ववत न केल्यास रेल्वे चक्का जाम व भारत बंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात येईल आणि त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा रेल्वे कर्मचारी युनियनने केंद्र सरकारला दिला. यावेळी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे महासचिव कमलाकांत त्रिपाठी म्हणाले की, पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा हक्क असून आम्ही तो मिळवणारच .पेन्शन ची मागणी पूर्ण करण्यासाठी गरज पडल्यास संपावर जाण्याचा इशारा दिला.सरकारने कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात घ्यावी असेही ते यावेळी म्हणाले.
“नो पेन्शन नो वोट” जो पेन्शन की बात करेंगा वही देशपर राज करेंगा” यासारख्या घोषणांनी आंदोलकांनी रामलीला मैदानाचा परिसर दणाणून सोडला होता.
या आंदोलनासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष देविदास बस्वदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे ,विदर्भ विभागप्रमुख किरण पाटील ,जिल्हा सचिव सुनील शिंदे,नारायण पेरके, संजय मानकरी यांचेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या देशस्तरीय जून्या पेन्शन आंदोलनाचे स्वागत राज्यसंघटक राजेंद्र निमसे , संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम ,जिल्हा कार्याध्यक्ष शरद वांढेकर , ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष विष्णू बांगर , जिल्हा सरचिटणीस सुरेश नवले , संघाचे जिल्हा कोषाध्यक्ष संजय शेळके , ऐक्य मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू चौधरी, जिल्हा कोषाध्यक्ष दत्तात्रय परहर ,संघाचे जिल्हा कार्या .चिटणीस प्रदीप चक्रनारायण ,अखिल डीसीपीएस चे जिल्हाध्यक्ष संदीप भालेराव , अखिल पदवीधर चे जिल्हाध्यक्ष रज्जाक सय्यद , जिल्हानेते राजकुमार शहाणे ,संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर रणदिवे , मधुकर डहाळे , विलास लवांडे , महेश लोखंडे , ज्ञानदेव कराड ,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष दिपाली बोलके , जिल्हा सरचिटणीस संगीता घोडके , बँकेच्या माजी संचालिका संगीता निमसे , जिल्हा संयुक्त चिटणीस मनिषा क्षेत्रे , संगीता निगळे , नगर तालुका महिला आघाडी अध्यक्ष सविता नागरे ,नगर संघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग देवकर ,पारनेर संघाचे अध्यक्ष लक्ष्मण चेमटे , ऐक्य मंडळाचे पारनेर तालुकाध्यक्ष संतोष , ठाणगे ,सुधाकर बोऱ्हाडे , रवींद्र अनाप ,संजय सोनवणे ,जनार्दन काळे , प्रताप कदम , बथूवेल हिवाळे ,उद्धव डमाळे ,नंदू गायकवाड , शिवाजी माने ,सुखदेव डेंगळे बंडू नागरगोजे , लक्ष्मण जटाडे राजेंद्र सोनवणे , शहाजी जरे यांनी केले आहे .
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची पेन्शन संघर्ष यात्रा ही ५ सप्टेंबर ( शिक्षक दिन ) ते ५ ऑक्टोबर (जागतिक शिक्षक दिन ) या कालावधीत भारताच्या चार सीमेवरुन ही यात्रा अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक स़ंघ काढणार आहे.त्याद्वारे जाणीव जागृती करण्यात येणार आहे.पेन्शन मिळेपर्यंत निरंतर आंदोलन करण्यात येणार आहे.
– राजेंद्र निमसे ( राज्यसंघटक )