Sunday, December 8, 2024

सरकारी कर्मचारी, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास राज्य सरकार तयार, ‘यांना’ मिळणार लाभ…

राज्यातील सरकारी कर्मचारी व शिक्षकांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी राज्य सरकारने अखेर मान्य केली आहे. जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करा या मागणीसाठी मागील वर्षी कर्मचारी-शिक्षकांनी संप केला होता. सरकारच्या आश्वासनानंतर संघटनेने संप स्थगित केला होता. अखेर राज्य सरकारने दिलेला शब्द पाळला असून पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय मान्य केला आहे.

राज्य सरकारकडून सरकारी कर्मचारी व शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना मान्य करण्यात आली आहे. त्यानुसार 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सरकारने जाहिरात दिलेल्या आणि त्या वेळी निवड केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. याशिवाय 1 नोव्हेंबर 2005 पर्यंत निवड झालेल्या मात्र या तारखेनंतर पोस्टिंग मिळालेल्या कर्मचारीही यात समाविष्ट करण्यात आलेत. यासोबतच संबंधित तारखेच्या नंतर केवळ वैद्यकीय आणि पोलीस पडताळणी राहिलेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा फायदा होणार आहे. महत्वाचं म्हणजे एक नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत असलेल्या व त्याआधी निवड झालेल्या सर्व सरकारी कर्मचारी व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना किंवा नवी पेन्शन योजना निवडावी असा पर्याय देण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांनी निवडलेल्या पर्यायानुसार त्याचे पेन्शन अमाऊंट ग्राह्य धरले जाणार आहे. मात्र, 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळण्याची मागणी होत होती. ती अजून पूर्ण झालेली नाही.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles