उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी जुन्या पेन्शन योजनेबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.फडणवीस म्हणाले, अर्थव्यवस्थेच्या टक्केवारीमध्ये जुनी पेंशन योजनेचा भार फार मोठा असणार नाही. म्हणून मी हे स्पष्ट सांगतो. आम्ही ही पेंशन योजना राबण्यासाठी कुठेही नकारात्मक नाही. आणि यामध्ये सर्वांशी चर्चा करून, आर्थिक दृष्टीकोनातून चर्चा करून काय मार्ग निघू शकतो. पण दीर्घकालीन मार्ग आपल्याला काढावा लागेल. तात्पुरता मार्ग काढून आपल्याला चालणार नाही,” असं महत्त्वपूर्ण विधान फडणवीसांनी केले आहे.
काही लोक यावरती बोलतात, पण पेंशन योजनेत बदल करायचा असेल, जुनी पेंशन योजना राबवायची असेल तर ही धमक आमच्यामध्येच आहे. बाकीचे लोक नाही करू शकणार. बाकी फक्त बोलणारे लोक आहेत,” असे फडणवीसांनी सांगितले.