Friday, February 23, 2024

इंग्रजीत टमाट्याला म्हणतात..आजीबाईंचा गावरान ठसका उखाणा! Video

एका मराठमोळ्या आजींनी घेतलेला उखाणा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अतिशय गावरान भाषेत पण तितक्याच निर्मळपणे त्यांनी घेतलेला उखाणा ऐकून आपल्यालाही हसू आल्याशिवाय राहत नाही. चेहऱ्यावर खूप सुरकुत्या असलेल्या या आजींचे वयही ७० ते ८० च्या दरम्यान असेल असा अंदाज आहे. गुलाबी रंगाची सुती साडी, कपाळावर लाल मोठं कुंकू लावलेल्या या आजीबाई दिसत आहेत. प्रशिस शिरसाट या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा उखाण्याचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. आजींनी अतिशय अनोखा उखाणा घेतला आहे.

” इंग्रजीत टोमॅटोला म्हणतात टो टो…पाटलाच्या हातामध्ये इंद्राबाईचा फोटो” म्हणजे या आजीबाईंचे नाव इंद्रा पाटील असल्याचे समजते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles