अहिल्यानगर महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने माऊली संकुल येथे अधिकारी कर्मचारी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.
हिंदी मराठी धार्मिक गीतांच्या माध्यमातून आपली परंपरा संस्कृती जोपासण्याचे काम केले : आयुक्त यशवंत डांगे
अहिल्यानगर : महापालिकेतील अधिकारी कर्मचारी वर्षभर नगरकरांना सुविधा पुरवीत असताना त्यांना ताण-तणाव असतो त्यामुळे त्यांना थोडासा विरंगुळा मिळावा यासाठी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.अधिकारी कर्मचारी यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी व्यासपीठ निर्माण करून दिले जाते.त्या माध्यमातून अधिकारी कर्मचारी यांनी गीत सादर करत जीवनामध्ये आनंद घेण्याचे काम केले आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी एकापेक्षा एक गीत सादर केले असल्यामुळे कार्यक्रमात मोठा उत्साह पाहायला मिळाला. हिंदी मराठी धार्मिक गीतांच्या माध्यमातून आपली परंपरा संस्कृती जोपासण्याचे काम केले जाते. सर्व अधिकारी कर्मचारी यांनी चांगले काम करून राज्यातील 19 ड वर्ग महापालिकेमध्ये आपली महापालिका एक किंवा दोन नंबर मध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावे तसेच थकीत वसुली मोठ्या प्रमाणात गोळा केल्यानंतर कर्मचाऱ्यांची फरकापोटी असलेले देणे लवकरात लवकर देता येईल असे प्रतिपादन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले.
अहिल्यानगर महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने माऊली संकुल येथे अधिकारी कर्मचारी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले, यावेळी उद्घाटन आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी उपायुक्त सपना वसावा, जल अभियंता परिमल निकम,आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे, कर्मचारी कामगार युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, क्रीडा अधिकारी फिलिप्स, इंजिनिअर महादेव काकडे, अनिल लोंढे, राजेंद्र मेहत्रे, सतीश ताठे, किशोर कानडे आदीसह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
महानगरपालिकेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आयुक्त यशवंत डांगे यांनी ‘तुझी चाल तुरु तुरु’ हे मराठी गीत गायल्यानंतर अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये एक प्रकारे जल्लोष निर्माण होता, वन्स मोरचा नारा दिला, तसेच उपायुक्त सपना वसावा यांनी देखील गीत गात सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला, यावेळी अधिकारी कर्मचारी यांनी सुमारे 50 कार्यक्रमाचा आनंद घेतला. मनपा कर्मचारी नितीन गोरे यांनी ‘मुंबई से आया मेरा दोस्त’ हे गीत गात असताना सभागृहात एकच जल्लोष झाला व कर्मचारी यांनी स्टेजवर जाऊन नाचण्याचा आनंद घेतला