अहमदनगर-जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागामार्फत सेस निधीतून जिल्ह्यातील ३ शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ लाखाची आर्थिक मदत शुक्रवारी प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ही मदत संबंधित कुटुंबियांकडे सुपूर्द केली प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ही मदत संबंधितांना देण्यात येणार आली.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, सीईओ आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, राहुल शेळके यांनी या कार्यक्रमाचे हे नियोजन केले आहे.सेस निधीतून विविध योजना किंवा धोरणात्मक कामासाठी जिल्हा परिषद खर्च करते. देशसेवेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबियांची काळजी घेणे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. याच सामाजिक दायित्तातून जिल्हा परिषद सेसमधून ही मदत करण्याची संधी मिळाल्याची भावना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी व्यक्त केली
यात वीरपत्नी शितल संतोष जगदाळे (भोयरे गांगर्डा, ता. पारनेर), वीरपत्नी अंबिका नारायण भोंदे (पिंपळगाव माळवी, ता. नगर) व वीरमाता लताबाई आजिनाथ मेहेत्रे (मिरजगाव, ता. कर्जत) यांना प्रत्येकी १ लाखाची आर्थिक मदत देण्यात आली .