Wednesday, May 14, 2025

नगरमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसेच्यावतीने स्व.अनिल राठोड यांना अभिवादन

गुरुपौर्णिमेनिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्यावतीने स्व.अनिल राठोड यांना अभिवादन

दुसर्‍यांसाठी जीवन अर्पण करण्याची शिकवण गुरु देतात

– संभाजी कदम

नगर – गुरु आपल्या शिष्यांना ज्ञानदान करुन त्यांचे विचार प्रगल्भ व समृद्ध करुन त्यांचे व्यक्तीमत्व प्रभावशाली बनवून जीवनाला आकार देण्याचे काम गुरु करत असतात. गुरुप्रती आपली श्रद्धा ही त्यांनी दिलेली शिकवण ज्ञानात भर टाकणारी ठरत असते. स्व.अनिलभैय्या राठोड यांनी जनसेवेची दिलेली शिकवण जीवनाला दिशा देणारी आहे. योग्य मार्गदर्शनामुळे जीवनात अनेक आमुलाग्र बदल होऊन दिशा मिळाली. त्यांची जनसामान्याप्रती असलेली तळमळ आणि दुसर्‍यांसाठी जीवन अर्पण करण्याची त्यांची शिकवण ही सदैव मार्गदर्शन राहील, असे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले.

गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसेना कार्यालयात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्यावतीने स्व.अनिल राठोड यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, संजय शेंडगे, दत्ता कावरे, शाम नळकांडे, सचिन शिंदे, सुरेश तिवारी, संदिप दातरंगे, कैलास शिंदे, गणेश झिंजे, संतोष तनपुरे, दिपक भोसले, अण्णा घोलप आदि उपस्थित होते.

याप्रसंगी विक्रम राठोड म्हणाले, सामाजिक कार्याबरोबरच जनसेवेत शिष्यांनी प्रयत्नशिल राहून समाजोन्नत्तीचे काम करावे. गुरुबरोबरच आई-वडिल आणि आपल्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणार्‍या व्यक्तींप्रती आदर करावा असे स्व.अनिलभैय्या राठोड यांचे व्यक्तिमत्व होते. सार्वजनिक जीवनात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारे ते खरे गुरु होते, असे सांगितले.

याप्रसंगी भगवान फुलसौंदर यांनी स्व.अनिलभैय्या राठोड यांच्या विचार गुरुस्थानी आहेत. ते कायम दिशा दर्शक राहतील, असे सांगितले.

सूत्रसंचालन शाम नळकांडे यांनी केले तर आभार सचिन शिंदे यांनी मानले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles