*सहा दिवसांची विशेष नैमित्तिक रजा मंजूर-*
*साहेबराव अनाप*
अहमदनगर- जागतिक अपंग दिनानिमित्त जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय विविध विभागातील गुणवंत कर्मचाऱ्यांचा *गुणवंत दिव्यांग कर्मचारी पुरस्कार* वितरण सोहळा मंगळवारी 3 डिसेंबरला सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद सभागृह, अहमदनगर येथे होणार आहे.या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिष येरेकर साहेब, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संभाजीराव लांगोरे साहेब, शिक्षणाधिकारी श्री भास्करराव पाटील साहेब, मुख्य लेखा वित्त अधिकारी श्री राजू लाकूडझोडे साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राहुल शेळके, शिक्षक नेते सुरेश निवडूंगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक बँकेचे माजी चेअरमन श्री साहेबराव अनाप यांनी दिली.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दरवर्षी अपंग कर्मचारी संघटनेमार्फत दिव्यांग कर्मचारी मार्गदर्शन कार्यशाळा व पुरस्कार वितरण समारंभ हा कार्यक्रम आयोजित केला जातो.जिल्ह्यातील विविध विभागांमध्ये शारीरिक अडचणीवर मात करून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान होणार आहे. यावर्षी या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त अहमदनगर जिल्हा परिषदेने 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर अखेर सहा दिवसांची विशेष नैमित्तिक राजा मंजूर केली आहे. त्याचा सर्व दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कार्याध्यक्ष राजू आव्हाड व सचिव पोपट धामणे यांनी केले आहे.
गुणवंत दिव्यांग कर्मचारी पुरस्कार पुढील प्रमाणे
श्रीमती शैला आंबरे, अकोले श्री पांडुरंग गांगर्डे, कर्जत श्री सुभाष फसले, जामखेड श्री भिमराज चव्हाण, राहुरी श्री गणेश पुरुषोत्तम, शेवगाव श्री रावसाहेब तांबे, श्रीगोंदा श्रीमती शायदा शेख, संगमनेर श्री नंदकुमार खंडागळे, नगर श्री उद्धव थोरात, कर्जत श्री मारुती अनंत, पारनेर श्री सुनील सिनारे, श्रीरामपूर श्री नानासाहेब धुमाळ, नेवासा श्रीमती ज्योती गवळी,लिपिक, जि.प.मुख्यालय, प्रसाद डिबरे, शिर्डी संस्थान आदी कर्मचाऱ्यांना प्रमुख पाहुण्यांचे उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
यावेळी दिव्यांग कर्मचाऱ्यांना साधने व उपकरणे वाटप करणे, दिव्यांग कर्मचाऱ्यांचे प्रमोशन व सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करणे, वाहन भत्याचे प्रस्ताव मंजूर करणे व सोयीने बदल्या करणे यावर यावेळी चर्चा होणार आहे.जागतिक दिव्यांग दिनानिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राज्य सह कोषाध्यक्ष श्री संतोष सरवदे ,कोषाध्यक्ष राजेंद्र औटी , श्रीकांत दळवी,ज्येष्ठ मार्गदर्शक दत्तात्रय जपे ,उद्धव थोरात, बन्सी गुंड, राजेंद्र ठूबे, साहेबराव मले, रमेश शिंदे, विजय राऊत, अमोल चन्ने,किरण माने, शिवाजी आव्हाड, आबासाहेब बिडगर,गजानन मुंडलिक, अनिल घोलप, शिवाजी आव्हाड, दत्ता हजारे,सुनील मेचकर, भाऊराव नागरे, बळीराम जाधव, नारायण लहाने,खंडू बाचकर, अनिल ओहोळ, दादासाहेब गव्हाणे, रामकिसन डमाळे,विजय अंधारे, सचिन रनाते, अजय लगड आदींनी केले आहे