उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दि.27 रोजी शिवसैनिकांच्या रक्तातून साकारणार ‘उद्धव ठाकरे’ यांची प्रतिमा
नगर शहर शिवसेनेचा अनोखा उपक्रम
नगर – शिवसेना उद्धब बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरमधील शिवसैनिकांच्या रक्तातून साकारणार ‘उद्धव ठाकरे यांची प्रतिमा’, अशी माहिती शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी दिली. शनिवार दि. 27 रोजी उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नगर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वा. शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे आरती, स.11 वा. नेता सुभाष चौक, शिवालय येथे शिवसैनिकांच्या रक्तातून उद्धवजी ठाकरे यांची प्रतिमा रेखाटण्यात येणार आहे. तसेच वृक्षारोपण, चारा वाटप करण्यात येणार आहे.
रविवार दि. 28 रोजी सुरभी हॉस्पिटल येथे सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सर्व कार्यक्रमास सर्व पदाधिकारी, माजी महापौर, नगरसेवक, महिला आघाडी, युवा सेना, शिक्षक सेना, माथाडी कामगार सेना आदिंच्या सर्व पदाधिकार्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.