Saturday, March 2, 2024

प्रजासत्ताक दिनी अहमदनगरच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; भाव नसल्याने मेथी, कोथिंबीर रस्त्यावर फेकून दिली

मेथीचे दर कोसळल्याने अहमदनगरच्या भाजी मार्केटमध्ये शेतकऱ्याला आपली मेथी अक्षरशः रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. युवा शेतकरी वैभव शिंदे यांनी मेथीच्या जुड्या रस्त्यावर फेकून देत तीव्र संताप व्यक्त केलाय.
वैभव शिंदे यांनी अहमदनगरच्या भाजी मार्केटमध्ये चार हजार मेथीच्या जुड्या आणल्या होत्या. या मेथीला केवळ 50 पैसे जुडीप्रमाणे दर मिळाला आहे. यामध्ये त्यांचे गाडी भाडे देखील निघत नसल्याने त्यांनी मेथी रस्त्यावरती फेकून देत तीव्र संताप व्यक्त केला. आज देशात प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे मात्र मेथी आणि कोंथिंबीरीला भाव मिळत नसल्याने वैभव शिंदे यांनी रोश व्यक्त केलाय.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles