नगर- पुणे महामार्गावर सुपा औद्योगिक वसाहतीजवळ काल, बुधवारी पहाटे झालेल्या कार अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. याबाबत सुपा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी पहाटे एक ते दोनच्या दरम्यान कार पुण्याहून नगरच्या दिशेने जात असताना सुपा औद्योगिक वसाहतीजवळील इन्स्पायर हॉटेलच्या समोर पावसामुळे ओल्या झालेल्या रस्त्यावरून चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले.
कार रस्ता सोडून खाली उतरली व दोन ते तीन पलट्या घेऊन झाडीत थांबली. अपघात झाला तेव्हा कारमध्ये चालक व इतर दोन प्रवासी होते. या अपघातात प्रतीक रवी साठे (रा. तपोवन रस्ता, नगर) यांचा मृत्यू झाला असून इतर दोघे जखमी झाले आहेत. जखमींची नावे समजू शकली नाही.