Saturday, February 15, 2025

अहमदनगर पुणे महामार्गावर अपघातात एक ठार एक जण गंभीर जखमी

अहमदनगर पुणे महामार्गावरील राळेगण सिद्धी फाट्याजवळ चार चाकी वाहनाजवळ उभ्या असलेल्या व्यक्तींना अज्ञात वाहनाची धडक बसुन झालेल्या अपघातात एक जण जागेवर ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

याबाबत डॉ. गोपाळ गुणवंत पवार (रा. जरडी ता. सोयागाव जिल्हा छञपती संभाजी नगर) यांनी सुपा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवार (दि. १९) रोजी माझे भाऊ मयत गणेश गुणवंत पवार व वाहन चालक जखमी राहुल लिंबाजी राठोड (दोघेही रा. जरडी ता.सोयागाव जि. छञपती संभाजीनगर) हे गाडीने घरगुती सामान घेऊन पुण्याच्या दिशेने जात असताना सकाळी ५.३० वाजण्याच्या दरम्यान राळेगण सिद्धी फाट्याजवळ गाडी पंचर झाली म्हणून थांबून गाडी पंचर काढत होते.
त्याच वेळी एक अज्ञात वाहन जे नगरकडून येऊन पुण्याच्या दिशेने जात असताना या पंचर काढत असलेल्या वाहनाला व तेथील मयत गणेश पवार व जखमी राहुल राठोड यांना जोराची धडक देऊन निघुन गेले. ही धडक खुप जोराची असल्याने यात गणेश पवार जागीच मयत झाले व राहुल राठोड गंभीर जखमी झाले अशी फिर्याद दिली .

घटनेची माहिती मिळताच सुपा पोलिस स्टेशनचे पो.संदीप पवार आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल करून मयत व्यक्तीचा पंचनामा करत मृतदेह पुढील सोपसकर पुर्ण करण्यासाठी रुग्णालयात पाठवला. सुपा पोलिसांनी डॉ गोपाल पवार यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात वहान चालकाविरुध गुन्हा दाखल केला असुन सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक आरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय कानगुडे पुढील तपास करत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles