Thursday, July 25, 2024

नगर केडगाव बायपास रस्त्यावर टेलर-टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू

अहमदनगर-रस्त्यावर उभ्या असलेल्या टेलरवर टेम्पो धडकून टेम्पो चालकाचा (नाव, पत्ता नाही) मृत्यू झाल्याची घटना नेप्ती (ता. नगर) शिवारात मनमाडकडे जाणार्‍या बायपास रस्त्यावर घडली. या प्रकरणी पोलीस अंमलदार रवींद्र डावखर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेलर (एचआर 46 एफओ 771) चालकाविरूध्द (नाव, पत्ता नाही) नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चालकाने बंद अवस्थेतील टेलर नेप्ती शिवारात केडगाव बायपास ते मनमाडकडे जाणार्‍या रस्त्यावर नेप्ती कांदा मार्केटच्या पुढे उभा केला होता. निष्काळजीपणे रस्त्यावर उभ्या केलेल्या टेलरभोवती वाहतूक नियमांचे कोणतेही निशाण लावलेले नव्हते. त्या टेलरवर पाठीमागून आलेला टेम्पो (एमएच 45 एएफ 9190) धडकून टेम्पो चालकाचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रंजित मारग करत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles