Sunday, July 14, 2024

झाडाला गळफास घेऊन नगर तालुक्यातील एकाची आत्महत्या

अहमदनगर -शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन 50 वर्षीय इसमाने आत्महत्या केली. ही घटना पोखर्डी (ता. नगर) शिवारात घडली. मच्छिंद्र धोंडीबा गाडे (वय 50, रा. गजराजनगर काळा माथा, पोखर्डी, ता. नगर ) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. गाडे यांनी त्यांच्या गावातील शेतामधील एका लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.

त्यांना उपचारासाठी त्यांचे नातेवाईक राजू विश्वनाथ गाडे (रा. सूर्यनगर, तपोवन रस्ता, सावेडी, नगर) यांनी दि. 5 जुलै रोजी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले होते. परंतु मच्छिंद्र गाडे हे उपचारापूर्वीच मयत असल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषित केले. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. बोठे यांनी एमआयडीसी पोलिसांना खबर दिली आहे. त्यावरून एमआयडीसी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस उपअधीक्षक संपत भोसले, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार नेहुल करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles