OnePlus 11R : वनप्लस कंपनीने भारतात लाँच केलेला नवीन स्मार्टफोन OnePlus 11R ची प्री-बुकिंग सुरू केली आहे. या फोन सोबत कंपनी ५ हजार ९९९ रुपये किंमतीचे OnePlus Buds Z2 ईयरबड्स फ्री देत आहे. वनप्लसच्या ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेजच्या OnePlus 11R ची किंमत ३९ हजार ९९९ रुपये आहे. तर १६ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४४ हजार ९९९ रुपये आहे. या फोनला वनप्लसच्या अधिकृत वेबसाइटवरून, वनप्लस अॅप स्टोर, अमेझॉन इंडिया आणि वनप्लस एक्सपीरियन्सवरून प्री बुक करता येवू शकते.