Monday, April 22, 2024

OnePlus चा प्रिमियम फोन झाला स्वस्त,50MP कॅमेरा, १२०Hz रिफ्रेश रेट आणि बरचं काही…

वनप्लस १२ दोन महिन्यांपूर्वी लाँच झाला. बाजारात या स्मार्टफोनची खूप मागणी आहे. या फोनची बेसिक व्हेरिएंटची किंमत ६४,९९९ रुपये आहे. तर हायएन्ड व्हेरिएन्टची किंमत ६९,९९९ रुपये आहे. तुम्हाला हा मोबाईल खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.

प्लिपकार्टवर या फोन खरेदीवर १ टक्क्यांची सूट आहे. फ्लिपकार्टवर या फोनची किंमत ६४,०९९ रुपये आहे. या व्यतिरिक्त HDFC Bank credit bank युजर्स ईएमआयच्या मार्फत तुम्ही २,५०० रुपये वाचवू शकता. तसेच १२ महिन्यांच्या EMI वर फोन खरेदीवर अधिक ३५०० रुपयांची ऑफर मिळत आहे. या डिस्काऊंट ऑफरमार्फत तुम्ही ६०५६६ रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.

वनप्लस १२ मध्ये ६.८२ इंच डिस्प्ले मिळत आहे. फोनचा रिफ्रेश रेट १२०HZ आहे. तसेच वनप्लस १२ मध्ये स्मूथ डिस्प्ले मिळत आहे. फोन फ्लोई एमराल्ड आणि सिल्की ब्लॅक रंगात हा मोबाईल मिळतो. सॉफ्टवेयरच्या मार्फत फोनमध्ये OxygenOS आणि आऊट ऑफ बॉक्स Android 14 वर चालतो. फोन स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ प्रोसेसर पेक्षा कमी आहे.

कॅमेराच्या बाबतीत वनप्लस १२ हा फोन जबरदस्त आहे. फोनमध्ये हॅसलब्लेड कॅमेरा आहे. नाइटस्कॅप आणि पोर्टेट मोड सारखे फिचर्स मिळत आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सल प्रायमरी कॅमरा, ४८ मेगापिक्सल वाइड कॅमेरा, ३* ऑप्टिकल झूमसोबत ६४ मेगापिक्सल टेलीफोटो कॅमेरा, ४८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि ३२ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देखील आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles