Monday, September 16, 2024

लागवडीपेक्षा अधिक कांदा क्षेत्राचा पिक विमा… जिल्ह्यातील ७ तालुक्यात होणार तपासणी…

चालू वर्षीच्या खरीप हंगामात नगर जिल्ह्यातील संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, श्रीगोंदा, कोपरगाव आणि पाथर्डी या तालुक्यात 12 हजार 986.4 हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झालेली असल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाकडे आहे. याच काळात 20 हजार 626.42 टेक्टरवरील कांदा पिकाचा पिक विमा उतरवण्यात आलेला आहे. सरकारच्यावतीने दोन वर्षापासून एक रुपयात पिक विमा योजना राबवण्यात येत आहे. पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत गेल्या दोन वर्षांपासून शेतकर्‍यांना केवळ एक रुपयात या योजनेत सहभागी होता येते. शेतकर्‍यांच्या विमा हप्त्याची रक्कम राज्य सरकार भरते, त्यासोबत विमा उतरवितांना शेतकरी स्वतःच पिकाची नोंद करतो व यावेळी विमा उतरविलेल्या पिकाची कोणतीही पडताळणी होत नाही. नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास विमा उतरवलेल्या क्षेत्रानुसार शेतकर्‍याला नुकसान भरपाई मिळते. याचा गैरफायदा घेण्यात येत असल्याचे समोर येत आहे.

दरम्यान, अन्य पिकांच्या तुलनेत कांदा पिकाला जादा नुकसान भरपाई आहे. हेक्टरी 80 हजार रुपयांची भरपाई मिळते. यामुळेच कांदा पिकाचे पिक विमा उतरवण्यात बनवेगीरी करण्यात येत असल्याचा असल्याचा संशय विमा कंपन्यांनी कृषी आयुक्तालयाकडे केला आहे. नगर, नाशिक, पुणे, धुळे, सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर व बीड या जिल्ह्यात हा प्रकार झाल्याचा संशय आहे. याबाबत कृषी आयुक्तालयाकडे तक्रार आल्यानंतर राज्याच्या कृषी विभागाकडून याबाबत जिल्हास्तरावर संबंधीत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles