सामन्यपणे स्वयंपाकासाठी आपण 2 पद्धतीने कांदे कापतो. एक म्हणजे उभ्या स्लाइस, ज्या आपण वाटणात वापरतो आणि दुसरा म्हणजे बारीक ज्या आपण फोडणीसाठी वापरतो.
आता उभ्या स्लाइससाठी कांदा कांद्याची साल सोलून घ्या आणि तो मधून कापा. दोन भाग केल्यानंतर एक भाग घ्या.
व्हिडिओ त दाखवल्यानुसार किसणी तुम्हाला लागेल. ज्यावर चकत्या करण्यासाठीही ब्लेड असतो. या ब्लेडवर तुम्हाला अर्धा कांदा घासायचा आहे. तुम्ही पाहाल तर एरवी चिरता तसेच किंबहुना त्यापेक्षाही पाताळ असे स्लाइस होतात.आता बारीक कांदा चिरण्यासाठी कांद्याची साल काढून त्यावर चौकोनी आकारात चिर द्या आणि मग तो कांदा किसणीच्या ब्लेडवर किसा. बारीक कांदा झटपट चिरून होईल.
भरपूर कांदे कापायचे असतील तेव्हा ही ट्रिक नक्कीच कामी येईल. यामुळे कांदे चिरताना डोळ्यातून पाणीही येणार नाही असा दावा या गृहिणीने केला आहे.आता बारीक कांदा चिरण्यासाठी कांद्याची साल काढून त्यावर चौकोनी आकारात चिर द्या आणि मग तो कांदा किसणीच्या ब्लेडवर किसा. बारीक कांदा झटपट चिरून होईल.
भरपूर कांदे कापायचे असतील तेव्हा ही ट्रिक नक्कीच कामी येईल. यामुळे कांदे चिरताना डोळ्यातून पाणीही येणार नाही असा दावा या गृहिणीने केला आहे.