Wednesday, May 8, 2024

Onion Export: कांदा निर्यात बंदी शेतकरी संघटना आक्रमक

केंद्र सरकारने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नाराज केले आहे. गुजरातमधील दोन हजार मॅट्रिक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने गुजरातमधील कांद्यास परवानगी दिल्याच्या निर्णयाचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. या निर्णयानंतर नाशिकमधील शेतकरी आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारने सरसकट कांदा निर्यातीस परवानगी द्यावी, अन्यथा लोकसभा निवडणुकीत त्यांचे परिणाम दिसून येतील. मतदानावर बहिष्कार टाकू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
केंद्र सरकारने डिसेंबर महिन्यात कांदा निर्यातीची घोषणा केल्यानं नाशिक जिलह्यातील शेतकरी नाराज झाले होते. ३१मार्च २०२४ पर्यंत निर्यात बंदी कायम राहणार असल्याचे सरकारने पत्रक काढले. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याला विरोध देखील केला. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गुजरातमधील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली. मात्र दुसरीकडे लाल कांद्याची निर्यात बंदी उठवलेली नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles