नगर -कांदा निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काही दिवसांपूर्वी ना. राधाकृष्ण विखे पा. आणि मी केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा केली आहे. कांदा उत्पादकांच्या समस्या, कांद्याची आवक तसेच सर्व आकडेवारी मुद्देसूद मांडली. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी यावर सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगितले. एका आठवड्यात केंद्र सरकार कांदा निर्यात बंदी वर धोरणात्मक निर्णय घेईल. मागील काही दिवसांपासून मी आणि माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले तसेच जिल्ह्यातील भाजप चे पदाधिकारी एक संघ राहिल्याने जिल्ह्यात भाजपाने अनेक निवडणुकांमध्ये यश प्राप्त केले आहे. यात अनेकांचे सहकार्य लाभत असून आगामी काळातील निवडणुका या अत्यंत महत्त्वाच्या असल्याने प्रत्येकाने नियोजनाच्या तयारीला लागले पाहिजे. आप आपल्या गावातील बूथ कमिट्या तसेच तालुक्याच्या, जिल्ह्याच्या कमिट्या तयार करून आगामी काळातील प्रत्येक निवडणूक भाजपाचा उमेदवार त्या ठिकाणी कसा निवडून येईल याबाबतचे नियोजन करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले.
नगर तालुका खरेदी विक्री संघ तसेच जिल्हा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार व भिंगार अर्बन बँक निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार समारंभ सन्मान संपन्न झाला.
यावेळी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह माजी मंत्री तथा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सुळ, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, विनायकराव देशमुख, हरिभाऊ कर्डिले, रावसाहेब पाटील शेळके, अंकुश शेळके, अभिलाष घिगे, संतोष म्हस्के, भिंगार बँकेचे चेअरमन अनिल झोडगे व नवनिर्वाचित सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.