केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयानंतर किसान सभेचे नेते डॉ. अजित नवलेंनी टीका केलीय. कारण, सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क घटवण्याचा निर्णय उशिरा घेतल्यामुळं शेतकरी आणि व्यापारी यांचं अतोनात नुकसान झालं आहे. मागील निवडणुकांमध्ये सरकारला कांद्याच्या मुद्यामुळं तोटा झाला होता. त्यामुळं आता कांदा निर्यात धोरणामुळं तोटा होवू नये यासाठी राजकीय उद्देश समोर ठेवून सरकारनं हा निर्णय घेतल्याच अजित नवले म्हणाले.
दरम्यान, सरकारनं कांद्याच्या धोरणाबाबत दिरंगाई न करता शेतमालाला कोणतेही बंधने टाकू नये असे अजित नवले म्हणाले. विशेषत : कांद्यावर कोणतेही शुल्क लागणार नाही अशा प्रकारचा निर्णय यापुढे घ्यावा असे अजित नवले म्हणाले. आगामी काळात शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्याचं नुकसान होणार नाही असा निर्णय घ्यावा अशी मागणी अजित नवलेंनी केलीय.