Monday, September 16, 2024

मोठी बातमी! कांद्याचे दर वाढल्यानंतर सरकारचा मोठा निर्णय

सध्या बाजारात कांद्याचे दर वाढत आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या जवळ कांदा आहे, त्या शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होत आहे. मात्र, एका बाजूला कांद्याचे दर वाढत असताना सरकारनं दुसरा बाजूला मोठा निर्णय घेतला आहे. कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकारनं हालचाली सुरु केल्या आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये सरकार आता 35 रुपये किलो दराने कांद्याची विक्री करणार आहे. वाढत्या दरातून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

दिल्ली आणि लगतच्या शहरात कांदा 60 रुपये किलोवर
दिल्ली-एनसीआरमध्ये कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. या ठिकाणच्या दिलासा देण्यासाठी सरकारनं कमी दरात कांद्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं तेथील ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राष्ट्रीय राजधानी आणि लगतच्या शहरांमध्ये कांद्याचा भाव 60 रुपये किलोवर पोहोचल्यानंतर केंद्र सरकारने स्वत:हून सवलतीच्या दरात कांदा विकण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार आता या भागात 35 रुपये किलोने कांदा विकणार आहे. बाजारातील भाव मोडीत काढणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.

दरम्यान, सरकार आजपासून दिल्ली-एनसीआरमध्ये कांद्याची विक्री सुरू करणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने यासाठी नाफेड आणि एनसीसीएफला आदेश दिले आहेत. हे दोन्ही सरकारी युनिट 35 रुपये किलो दराने सर्वसामान्यांना कांदा उपलब्ध करून देणार आहेत.

नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांद्याची विक्री
नाफेड आणि एनसीसीएफ या दोन्ही सरकारी संस्था सरकारच्या वतीने सर्वसामान्यांना स्वस्त दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचे काम करतात. या संस्था मध्यवर्ती दुकाने, मोबाईल व्हॅन आणि इतर माध्यमातून सवलतीच्या दरात खाद्यपदार्थ लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. गतवर्षी देशभरात कांद्याचे तसेच टोमॅटोचे भाव प्रचंड वाढले असताना सरकारने नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून लोकांना स्वस्त दरात टोमॅटो आणि कांदे उपलब्ध करून दिले होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles