Monday, June 17, 2024

राहुरी विद्यापीठाकडून कांदा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध, कांदा बियाणे प्रति किलो

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी विकसित केलेले खरीप कांदा बियाणे फुले समर्थ व फुले बसवंत- ७८० या वाणांची दि. २१ मे २०२४ पासून विक्री शुभारंभ झाला आहे. सदर कांदा बियाणांची विक्री विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रमूख शास्त्रज्ञ (बियाणे) डॉ. आनंद सोळंके यांनी दिली आहे.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या कांद्याच्या फुले समर्थ व फुले बसवंत-७८० या वाणांना शेतकऱ्यांकडून दरवर्षी मोठी मागणी असते.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विद्यापीठातील मध्यवर्ती परिसरात बियाणे विक्री आणि मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक असलेल्या नाशिक, अहमदनगर व सातारा जिल्ह्यातील कृषि विद्यापीठाचे
१) कृषि संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक
२) कांदा, लसूण व द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत, जि. नाशिक
३) कृषि संशोधन केंद्र, चास, जि. अहमदनगर
४) कृषि संशोधन केंद्र, बोरगाव, जि. सातारा
५) कृषि महाविद्यालय, मालेगाव, जि. नाशिक
६) कृषि संशोन केंद्र, लखमापुर
७) कृषि विज्ञान केंद्र, धुळे
८) कृषि महाविद्यालय, पुणे
९) कृषि महाविद्यालय, हाळगाव ता. जामखेड, जि. अहमदनगर या ठिकाणी या वाणांची विक्री सुरु करण्यात येणार आहे.

यामुळे शेतकरी बांधवांना त्यांच्या जिल्ह्यामध्येच सदरचे कांदा बियाणे प्रति किलो रु. १५०० प्रमाणे उपलब्ध होणार आहे. त्याचा सर्व शेतकर्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रमूख शास्त्रज्ञ (बियाणे) डॉ. आनंद सोळंके यांनी केले आहे.

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles