माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी कमळ हाती घेतल्यानंतर आता शरद पवारांच्या गटातील बड्या नेत्याला गळाला लावण्याच्या तयारीत आहे. पश्चिम महाराष्ट्रात ताकद राखून असलेल्या नेत्याला भाजपमध्ये आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. स्वत:च्या जिल्ह्यात आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये वर्चस्व असलेल्या नेत्यांना पक्षात सामील करुन घेण्याचा भाजपकडून सुरू आहे. सहकार चळवळ, साखर कारखाने आणि संस्था यांच्यामुळे पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळेच शरद पवारांचे निष्ठावंत असलेल्या नेत्याला गळाला लावण्याची तयारी भाजपनं केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचं सरकार असताना प्रदीर्घकाळ महत्त्वाची खाती सांभाळलेल्या नेत्याला भाजपमध्ये आणून त्यांना किंवा त्यांच्या मुलाला लोकसभेचं तिकीट देण्याची तयारी भाजपनं सुरू केली. राष्ट्रवादी काँग्रेस अभेद्य असताना या नेत्याचे अजित पवारांशी फारसे जमत नव्हते. शरद पवारांचे विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. अजित पवारांच्या बंडानंतरही ते पवारांच्या बाजूनं भक्कमपणे उभे राहिले.
ऑपरेशन ‘लोटस’…शरद पवारांचा विश्वासू शिलेदारही साथ सोडणार !
- Advertisement -