OPPO नं आपल्या 5G स्मार्टफोनच्या पोर्टफोलियो मध्ये एका नव्या डिवाइसचा समावेश केला आहे. कंपनीनं मिड रेंजमध्ये OPPO A79 5G सादर केला आहे. कमी किंमतीत देखील हा फोन १६जीबी रॅमची ताकद देतो. सोबत ६.७२ इंचाचा एफएचडी+ डिस्प्ले, ५० मेगापिक्सल कॅमेरा आणि ५००० एमएएचची बॅटरी आहे.
OPPO A79 5G चा ८जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज असलेला एकमेव मॉडेल भारतीयांच्या भेटीला आला आहे. कंपनीनं ह्या स्मार्टफोनची किंमत फक्त १९,९९९ रुपये ठेवली आहे. हा डिवाइस ग्लोइंग ग्रीन आणि मिस्ट्री ब्लॅक सारख्या दोन कलर ऑप्शनमध्ये आला आहे. ह्याची विक्री २८ ऑक्टोबर म्हणजे उद्यापासून ओप्पो स्टोर, फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि रिटेल स्टोर्सवरून केली जाईल.