Oppo नं भारतात Reno 10 Pro 5G च्या किंमतीत कपात केली आहे. कंपनी लवकरच देशात Oppo Reno 11 सीरीज लाँच करणार आहे आणि त्याआधी ह्या स्मार्टफोनच्या किंमत कमी करण्यात आली आहे. ह्यात ६.७ इंचाचा फुल एचडी+ ओएलईडी ३डी कर्व्ड डिस्प्ले आहे. ह्यात प्रोसेसर म्हणून ऑक्टाकोर स्नॅपड्रॅगन ७७८जी ५जीचा वापर करण्यात आला आहे.
ह्यावर्षी जुलैमध्ये कंपनीनं Reno 10 सीरीज लाँच केली होती. Reno 10 Pro च्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या एकमेव व्हेरिएंटची किंमत ३९,९९९ रुपये आहे. हा फोन आता कंपनीच्या ऑनलाइन स्टोर सोबतच काही ई-कॉमर्स साइट्सवर ३७,९९९ रुपयांमध्ये विकला जात आहे. फोन ग्लॉसी पर्पल आणि सिल्व्हरी ग्रे कलर्समध्ये उपलब्ध आहे.
या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात OIS सपोर्टसह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो, सोबत ३२ मेगापिक्सलचा टेलीफोटो सेन्सर आणि ८ मेगापिक्सलचा वाइड-अँगल कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
विना अंड्याचा केक कसा बनवायचा ?…85 वर्षांच्या स्टाईलिश आजीबाईंनी सांगितली रेसिपी..व्हिडिओ