छावा हा चित्रपट नसून भावी पिढीसाठी प्रेरणा संदेश आहे : आमदार संग्राम जगताप
महिलांसाठी विनामूल्य चित्रपट पाहण्याची संधी
नगर : छावा हा धर्मवीर संभाजी महाराज यांचे शौर्य व जीवन गाथेवर आधारित असलेला चित्रपट अहिल्यानगर शहरातील महिलांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आहे. इतर चित्रपट आपण मनोरंजन म्हणून पाहत असतो परंतु छावा हा चित्रपट नसून तो भावी पिढीसाठी एक प्रेरणा संदेश असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
अहिल्यानगर शहरातील माता-भगिनींसाठी हा चित्रपट आज सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी पासून शहरातील चित्रपटगृहांमध्ये विनामूल्य प्रदर्शित करण्यात येत आहे.
आपल्या माता भगिनी भावी पिढी घडविण्याचे कार्य करीत असतात. त्यामुळे धर्मवीर संभाजी महाराज यांचे शौर्य तसेच त्यांनी हिंदुत्वासाठी सहन केलेल्या हाल अपेष्टा या माता भगिनींच्या माध्यमातून समाजासमोर याव्यात या हेतूने हा चित्रपट माता-भगिनींसाठी विनामूल्य प्रदर्शित करण्यात येत असल्याचे यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले
धर्मवीर संभाजी महाराजांना धर्मांतर करण्यासाठी प्रचंड यातना देण्यात आल्या परंतु मी शिवपुत्र आहे, हिंदू म्हणून जन्माला आलो आणि हिंदू म्हणूनच हे जग सोडून जाणार आहे असा दृढनिश्चय शंभूराजांनी केला. हिंदुत्वासाठी त्यांनी मरण पत्करले परंतु त्यांनी धर्मांतराचा प्रस्ताव कधीही स्वीकारला नाही.
अशा या महान धर्मवीर संभाजी महाराजांचे कार्य भावी पिढीपर्यंत पोहोचावे तसेच माता-भगिनींच्या माध्यमातून आपल्या मुलांवरही असेच शौर्याचे संस्कार व्हावेत या हेतूने हा विनामूल्य चित्रपट प्रदर्शित करण्याचा उपक्रम काही हिंदू प्रेमी उद्योजकांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. त्या सर्वांचे मी आभार मानतो असेही आमदार जगताप यावेळी म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येने महिला माता-भगिनी उपस्थित होत्या