गडचिरोलीत दोन चिमुकल्या भावंडांना ताप आला आणि त्यानंतर काही तासांच्या अंतराने दोघांचाही संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. या चिमुकल्या दोन्ही भावंडांना ताप आल्यानंतर उपचारासाठी डॉक्टरांकडे घेऊन जाण्याऐवजी पुजाऱ्याकडे नेलं होतं, असंही सांगितलं जात आहे. यानंतर आई-वडिलांनी रुग्णालय गाठले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. त्यानंतर वेळेवर शववाहीका उपलब्ध नसल्याने मृतदेह खांद्यावर घेऊन जड पावलांनी १५ किलोमीटर पायपीट करत त्यांनी घर गाठले. दरम्यान, अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथील या घटनेचा व्हिड़ीओ व्हायरल झाल्यानंतर हळहळ व्यक्त होत आहे.
https://x.com/VijayWadettiwar/status/1831548654382936147?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1831548654382936147%7Ctwgr%5Ea2b7e3317738f3286c979578f9e8d9523e70180c%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra%2Fopposition-leader-vijay-wadettiwar-on-gadchiroli-health-care-and-devendra-fadnavis-dharmarao-baba-atram-gkt-96-4577650%2F
जिवंतपणी मरण यातना….. आरोग्यसेवेच्या विदारक स्थितीचा व्हिडीओ
- Advertisement -