अशोक लांडे प्रकरणात शिक्षा लागलेले संदीप,सचिन,अमोल कोतकर यांच्या जामीनास या गुन्ह्याचे फिर्यादी शंकर राऊत यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले असून मेडीकल पॅरीटीवर दिलेल्या जामीन बाबत उच्च न्यायालयात रिव्ह्यू पीटिशन करून आव्हान दिले आहे मुंबई येथे या प्रकरणाची सुनावणी २५ सप्टेंबर रोजी होणार आहे.या प्रकरणात ऍड जितेंद्र गायकवाड आणि ऍड पाटील हे कामकाज पाहत आहेत.
तसेच जिल्हा बंदी उठवेला सचिन कोतकर हा नगर जिल्ह्यात आलेवर त्याने एका हॉटेल कमगरास मारहाण केल्याचा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. त्यामधील कलम ३५१(३) मध्ये ७ वर्ष शिक्षेची तरतुद आहे.मात्र ३ महिन्यात अजून कोणताही तपास झाला नाही या प्रकाराबाबत सचिन कोतकरचा जामीन रद्द करावा. त्याने पुन्हा गुन्हेगारी करण्यासाठी डोके वर काढलेले आहे हे पोलीसांना अर्ज करुन नंतर न्यायालयात जनहित याचिका करण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यातून त्याची हकालपट्टी करावी अशा प्रकारची जनहित याचिका हायकोर्टात दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती शंकर राऊत यांनी नगर मध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली आहे.
नगरच्या अशोक लांडे खून प्रकरणात न्यायालयाने काँग्रेसचे तात्कालीन जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर, त्याची तीन मुले माजी महापौर संदीप याच्यासह सचिन व अमोल यांना दोषी ठरवत या चौघांना जन्मठेप सुनावली. या प्रकरणातील अन्य आरोपी स्वप्निल पवार व वैभव अडसूळ यांना दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती.