कोपरगाव -तालुक्यातील नाटेगाव येथे ९० ब्रास मुरुमाचे अनधिकृतपणे उत्खनन करून त्याची वाहतूक केल्याप्रकरणी तत्कालीन सरपंच व ग्रामसेविकेला तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी ५ जुलै २०१४ रोजी ११ लाख ४४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथे गारदा नदीलगत अनधिकृतपणे १० ब्रास मुरुमाचे उत्खनन करून त्याची वाहतूक केली असल्याची तक्रार दि. ६ मे २०२१ रोजी अँड. दीपक दादाहरी पोळ यांनी केली होती. तक्रार प्राप्त कोपरगावच्या झाल्यानंतर मंडलाधिकाऱ्यांनी नाटेगाव येथे जाऊन गारदा नदीलगत उत्खनन केलेल्या जागेची पाहणी केली व पंचनामा करून तहसील कार्यालयास सादर केला. या पंचनाम्यामध्ये तत्कालीन सरपंच विकास अशोक मोरे व ग्रामसेविका एस. डी. अवचिते-बत्तीशे यांनी १० ग्रास मुरूम या गौणखनिजाचे अनधिकृतरीत्या उत्खनन वाहतूक केल्याचे म्हटले होते.करून
त्यानुसार सरपंच विकास मोरे,ग्रामसेविका अवचिते-बत्तीशे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) (८) व त्यात महाराष्ट्र शासन अधिनियम क्र.२७/२०१५ नुसार कार्यवाही का करण्यात येऊ नये? अशी नोटीस बजावली होती.यावर ग्रामसेविकेने सादर केलेला लेखी खुलासा संयुक्तिक नसल्याने अमान्य करण्यात आला. तहसीलदार
भोसले यांनी ५ जुलै २०१४ रोजी यावर निर्णय देत तत्कालीन सरपंच विकास मोरे, ग्रामसेविक अवचिते बत्तीशे यांना विनापरवानगी व अनधिकृतरीत्या मुरूम उत्खनन करून वाहतूक केल्याप्रकरणी ११ लाख ४४ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावला.