Monday, September 16, 2024

जिल्हा शासकीय रुग्णालयात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र, तिघांचा समावेश गुन्हा दाखल करण्याचे आदेश

अहमदनगर -लॉगिन आयडी वापरून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळविल्याप्रकरणी दिव्यांग आयुक्त यांच्या सुचनेनुसार तीन जणांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी सांगिलते.

येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणी केली नसतानाही काही व्यक्तींनी शासनाच्या स्वावलंबन कार्ड या संकेतस्थळावरून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवले असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात जिल्हा रुग्णालयाने दिव्यांग आयुक्त यांचे मार्गदर्शन मागितले होते. त्यांनी समितीमार्फत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. घोगरे यांनी तीन जणांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. यामध्ये घोडेगाव (ता. नेवासा) येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. शिवशंकर वलांडे, टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.प्रकाश लाळगे व डॉ. चंदाराणी पाटील यांचा समावेश आहे.

तसेच गुन्हा दाखल करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक तथा प्रशासकीय अधिकारी डॉ.साहेबराव डावरे यांना प्राधिकृत केले आहे. त्यांनी सोमवारी तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांची भेट घेतली होती. त्यांनी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात मुद्दे उपस्थित केले होते. त्यानुसार सुरूवातीला चौकशी केली जाणार असून नंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे डॉ.घोगरे यांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles