एकता फौंडेशन व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
पक्षाच्या वतीने दि.10 ऑगस्ट रोजी जॉब फेअरचे आयोजन
तरुणांना सहभागी होण्याचे आवाहन – शहरप्रमुख सभांजी कदम
नगर – एकता फौंडेशन व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने शनिवार दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजपर्यंत जॉब फेअरचे आयोजन माउली सभागृह, नगर मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संभाजी कदम यांनी दिली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख संभाजी कदम यांच्या संकल्पनेतून युवकांना नोकरी मिळावी या हेतूने या नोकरी मेळाव्याचे विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य आयोजन करण्यात आहे. शिवसेनेच्या वतीने सध्या भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्या अतंर्गत या जॉब फेअरचे करण्यात आले आहे. यामध्ये अहमदनगर, पुणे, सुपा , चाकण आणखी विविध शहरातील आय टी आय , नर्सिंग, आय टी , इंडस्ट्रियल , फायनान्स , इंजिनीरिंग , मेडिकल , मार्केटिंग , सेल्स, मीडिया, अश्या विविध क्षेत्रातील नामवंत 50 कंपन्याचा सहभाग या जॉब फेअर मध्ये सहभाग होणार आहेत.
या जॉब फेअर मध्ये हजारो नोकरी च्या संधी उपलब्ध असून युवकांनी आपले बायो डाटा घेऊन समक्ष मुलाखत देऊन नामाकिंत कंपनी मध्ये नोकरी मिळविण्याची संधी एकता फौंडेशन व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
या जॉब फेअर मध्ये सहभागी होण्यासाठी 7020553523 या क्रमांकावर संपर्क साधावा.
तसेच खलील लिंक वर गुगल फॉर्म भरून सहभागी व्हावे.
https://forms.gle/SWC6pWD3AWXqM9hf7
नगर शहरात 10 ऑगस्ट रोजी जॉब फेअरचे आयोजन, नामवंत 50 कंपन्याचा सहभाग
- Advertisement -