कर्जत तालुक्यात प्रथमच राज्यस्तरीय कृषीप्रदर्शनाचे आयोजन
कर्जत तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी बंधू आणि भगिनी यांच्या साठी कर्जत तालुक्यातील सदगुरू ग्राम विकास प्रतिष्ठान, कर्जत व कृषी उत्पन्न बाजार समिती कर्जत यांच्या वतीने राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन दि. ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान कर्जत शहरात फाळके पेट्रोल पंपा शेजारील मैदानावर आयोजित करण्यात आले आहे .
तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी बंधू व भगिनी सह नव उद्योजक,व्यावसायिक, नोकरदार व खवय्ये यांना या प्रदर्शनाचा लाभ मिळणार आहे .
या कृषी प्रदर्शना मध्ये नवनवीन तंत्रज्ञान, अवजारे, ट्रॅक्टर्स ,ठिबक सिंचन, सोलर,खते बी बियाणे,पशुसंवर्धन व पशुआहार सह शेती विषयक सर्व काही एकाच ठिकाणी पाहता येणार असून महिलांसाठी घरगुती उद्योगाची माहितीही उपलब्ध होणार आहे .
या कृषी प्रदर्शनाचे खास आकर्षण एक कोटी किमतीची भारतातील प्रसिद्ध , अनेक पुरस्कार प्राप्त कर्नाटक येथील ” रेडा जोडी ” असणार आहे .
तसेच महिलांसाठी गृहोपयोगी वस्तुंचे अनेक स्टॅाल्स या ठिकाणी असणार आहेत .
तसेच खवय्या साठी कोल्हापुरी पांढरा-तांबडा रस्सा व निरनिराळ्या खुप सा-या पदार्थाची चव घ्यायला मिळणार आहे .
हे कृषी प्रदर्शन सर्वांसाठी मोफत आहे. या कृषी प्रदर्शनाचे आयोजन सदगुरू ग्राम विकास प्रतिष्ठान कर्जत व कृषी उत्पन्न बाजार समिती कर्जत यांनी केले आहे.
कर्जत तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक व खवय्ये यांनी या प्रदर्शनाला आवश्य भेट द्यावी व लाभ घ्यावा हि विनंती सदगुरू ग्राम विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र फाळके पा व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर व सर्व संचालक यांनी केले आहे