शब्दगंध साहित्य संमेलनाचे उद्घाटन पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते होणार.
हिवरे बाजार गावांमध्ये जलसंधारण, पर्यावरण, वृक्षारोपण व संवर्धनचे उत्कृष्ट काम पाहून मनाला समाधान वाटले : संपत बारस्कर
अहिल्यानगर : महाराष्ट्र राज्य शब्दगंध साहित्य संमेलन ८ व ९ फेब्रुवारी रोजी सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयामध्ये होत असून त्याच्या उद्घाटनाचे निमंत्रण पद्मश्री पोपटराव पवार यांना आदर्श गाव हिवरे बाजार येथे जाऊन देण्यात आले. यावेळी त्यांनी निमंत्रणाचा स्वीकार केला,व हिवरे बाजार गावांमध्ये जलसंधारण, पर्यावरण, वृक्षारोपण व संवर्धन चे उत्कृष्ट काम पाहून मनाला समाधान झाले. पद्मश्री पोपटराव पवार यांनी केलेल्या कामाच्या माध्यमातून ऊर्जा व प्रेरणा मिळाली गावात सुरू असलेल्या योजनांची माहिती घेत कामांची पाहणी केली. शब्दगंध साहित्य संमेलनाचे उद्घाटन पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिली.
सावेडी कोहिनूर मंगल कार्यालय येथे होत असलेल्या शब्दगंध साहित्य संमेलन उद्घाटनाचे निमंत्रण पद्मश्री पोपटराव पवार यांना देताना स्वागत अध्यक्ष संपत बारस्कर, शब्दगंध साहित्य परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, राजेंद्र चोभे आदी उपस्थित होते.
चौकट : १६ व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचे उद्घाटन माझ्या हस्ते संपन्न होणार आहे. शब्दगंध साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ आपल्या शहरांमध्ये रुजली असून त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. राज्यभरातून नामवंत कवी साहित्यिक लेखक उपस्थित राहत मराठी भाषा वाढविण्याचे काम केले जाते. या माध्यमातून नवीन साहित्यिक कवी निर्माण होत असतात, साहित्यिकांच्या माध्यमातून आपली परंपरा संस्कृती जोपासली जात असल्याचे मत पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.